शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाने चाकूने वार करत नवरीची केली हत्या, दोन दिवसांआधीच केलं होतं लव्ह मॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 09:01 IST

Crime News : घटनेच्या दोन दिवसांआधी दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस कुटुंबियांची चौकशी करत आहेत. 

Crime News :   छत्तीसगढच्या रायपूरमध्ये हत्या आणि आत्महत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. इथे लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशीच नवरीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. हैराण करणारी बाब म्हणजे नवरीची हत्या नवरदेवानेच केली. एक दिवसाआधीच लग्न झालेल्या नवरीची हत्या केल्यानंतर नवरदेवाने आत्महत्या केली. या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. ज्या घरात लग्नाचा जल्लोष सुरू होता, तिथे आता शोककळा पसरली आहे.

घटनेच्या दोन दिवसांआधी दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचे आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस कुटुंबियांची चौकशी करत आहेत. 

राजातालाब परिसरात राहत असलेल्या कहकशां बानो(22) चा निकाह असलमसोबत 19 फेब्रुवारीला झाला होता. 21 तारखेला रात्री त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. परिवारातील सगळे लोक तयारी करत होते. आनंदाचं वातावरण होतं. असलम आणि कहकशां सुद्धा रूम बंद करून तयार होत होते. काही वेळाने रूममधून ओरडण्याचा आवाज आला.

कुटुंबियांनी रूम उघडून पाहिली तर दोन मृतदेह पडले होते. कहकशांच्या शरीरावर कपडेही नव्हते. लगेच या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना आढळलं की, कहकशांच्या पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले आहेत. असं वाटत होतं की, त्यांच्या मारहाण झाली असेल.

पोलीस अधिकारी राजेश चौधरी यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री साधारण 7 वाजता नवरीला तयार करण्यासाठी एक ब्युटिशिअन असलमच्या घरी पोहोचली होती. नवरदेवाने तिला रूममधून बाहेर पाठवलं आणि दोघेही कपडे बदलत होते. तेव्हाच दोघांमध्ये असंकाही झालं की, नवरदेवाला राह आला आणि त्याने चाकूने नवरीवर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केली.

दोघांचं रूममध्ये असताना भांडण कशावरून झालं याची शोध घेतला जात आहे. पोलिसांनी असलम आणि गावात पोलीस फोर्स वाढवली आहे. राजातालाब परिसरात शेकडो लोक जमा झाले होते. सगळ्यांना या हत्येमागे काय कारण आहे? असा प्रश्न पडला होता.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी