शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 13:17 IST

Crime News : रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - देशात बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील आजोबा, काका आणि भावाने चिमुकलीचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

पोलिसांनी या प्रकरणात एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनो सात वर्षांच्या नातीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच मुलीला मारहाण देखील करण्यात आली. मारहाण केल्या प्रकरणात मुलीचा काका आणि मुलीच्या 16 वर्षीय भावालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना चेन्नईजवळील मडिप्पकममध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचा ऑनलाईन क्लास असल्याकारणाने आजोबा आपल्या नातवांना घरी घेऊन आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगाही राहत होता.

पोलिसांनी सांगितले की, 2 ऑगस्टच्या रात्री चिमुकली झोपली होती. त्यावेळी तिच्याच शेजारी झोपलेले तिचे आजोबा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी मदतीसाठी तिच्या काकाच्या खोलीत गेली आणि तिला शांत करण्याच्या नावाखाली काकाने देखील तिच्यासोबत गैरवर्तन केले. यानंतर मुलगी पुन्हा तिच्या 16 वर्षांच्या भावाकडे मदतीसाठी गेली. पण तिची सुटका झाली नाही आणि तिच्या भावानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

रविवार 8 ऑगस्ट रोजी, जेव्हा मुलीची आई तिला भेटायला गेली, तेव्हा तिने पाहिले की मुलगी आजारी पडली आहे. ती मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. 7 वर्षांच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. मेडिकल चेकअप केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. मुलीच्या आईने मडिप्पकम ऑलवुमन पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. आजोबा, काका यांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. तर 16 वर्षीय मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूIndiaभारतPoliceपोलिस