धक्कादायक! पत्नीने 'भाजी घेऊन या' म्हणताच पती संतापला; भररस्त्यात केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:44 IST2022-08-19T15:42:38+5:302022-08-19T15:44:01+5:30
Crime News : पतीला भाजी आणायला सांगणं एका पत्नीला चांगलंच महागात पडलं आहे.

धक्कादायक! पत्नीने 'भाजी घेऊन या' म्हणताच पती संतापला; भररस्त्यात केली बेदम मारहाण
नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच लहान मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे टोकालाही जातात अशीच एक घटना आता समोर आली आहे. पतीला भाजी आणायला सांगणं एका पत्नीला चांगलंच महागात पडलं आहे. पत्नी "भाजी घेऊन या" म्हणताच पती संतापला आणि त्याने तिला भररस्त्यात बेदम मारहाण करायला सुरुवात केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या कवी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. सौरव मिश्रा असं पतीचं नाव असून त्याने आपली पत्नी आरोही हिला मारहाण केली आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. महिलेने आपल्या पतीला मी दिवसभर खूप काम केल्याने आता खूप थकली आहे, त्यामुळे भाजी घेऊन या असं म्हटलं होतं.
पत्नीने भाजी आणायला सांगताच पती संतापला आणि तिला मारू लागला. त्यामुळे त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी महिला घराबाहेर धावत सुटली. पण त्याने तिला रस्त्यात देखील बेदम मारहाण केली. काही शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पती आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. तर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.