शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिहार हादरलं! 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; 'तिला' शेतात फेकून आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:10 IST

Crime News : गवत कापण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलीला शेतात बेशुद्धावस्थेत फेकून आरोपी फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संझा घाट गावात गवत कापण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी मीरगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

पीडितेच्या आईने आणि मामीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुलगी गवत कापण्यासाठी मक्याच्या शेतात गेली होती. आरोपी नितीश कुमार आणि मनीष कुमार हे दोघेही गावातच राहतात. मुलीचे तोंड दाबून ते तिला मक्याच्या शेतात घेऊन गेले. तिथे तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. बराच वेळ झाला तरी, मुलगी घरी आली नाही. त्यामुळे चिंतेत असलेले कुटुंबीय तिला शोधण्यासाठी गेले. मुलगी मक्याच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर कुटुंबीय मुलीला घेऊन मीरगंज पोलीस ठाण्यात गेले. 

धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि गावचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. गावचे प्रमुख अमित कुमार यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली. दोन्ही आरोपी फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ग्वाल्हेरच्या एका खासगी रुग्णालयात एका महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. 

खळबळजनक! रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न 

कोरोनाग्रस्त महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने तिला काही वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान रुग्णालयातील वॉर्ड बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलाने केलेल्या तक्रारीत शनिवारी रात्री एक वॉर्ड बॉय त्याच्या आईच्या वॉर्डमध्ये आला. महिला कोरोना संक्रमित असल्याने त्या ठिकाणी दुसरं कोणीही उपस्थित नव्हतं. याचाच गैरफायदा घेत त्या वॉर्ड बॉयने आईसोबत चुकीचे वर्तन सुरू केले. यानंतर आईने आरडोओरडा करायला सुरुवात केली. महिलेने आरडोओरडा केला असता वॉर्ड बॉय तेथून फरार झाला. त्यानंतर कोरोनाग्रस्त महिलेने आपल्या मुलाला कॉल करून हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. तसेच याबाबत कळताच मुलाने आपल्या नातेवाईकांसह रुग्णालय गाठलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वॉर्ड बॉयला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस