Crime News : पेण परिसरात युवतीवर सामूहिक बलात्कार, सात आरोपींना अटक, तिघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:11 IST2022-01-31T11:10:49+5:302022-01-31T11:11:24+5:30

Crime News : पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका १७ वर्षीय युवतीला धमकी देत काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News: Gang rape of a girl in Pen area, seven accused arrested, three absconding | Crime News : पेण परिसरात युवतीवर सामूहिक बलात्कार, सात आरोपींना अटक, तिघे फरार

Crime News : पेण परिसरात युवतीवर सामूहिक बलात्कार, सात आरोपींना अटक, तिघे फरार

 वडखळ : पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका १७ वर्षीय युवतीला धमकी देत काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे; तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. 
 पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरात राहणारी दहावीपर्यंत शिकलेली १७ वर्षीय युवती शेजारीच असलेल्या वाशी गावाच्या परिसरात एका हळदी समारंभासाठी गेली होती. या ठिकाणी या युवतीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रूपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. 
हे तरुण युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करत होते. मागील अनेक महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात पंधराहून अधिक जण सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे.  वडखळ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती
या  प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फरार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.

Web Title: Crime News: Gang rape of a girl in Pen area, seven accused arrested, three absconding