Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: October 29, 2022 00:09 IST2022-10-29T00:08:35+5:302022-10-29T00:09:20+5:30

Crime News: लातूर तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील व्हरांड्यात तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. तिथे पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली.

Crime News: Gambling raids; A case has been registered against 22 people, three and a half lakhs have been seized along with gambling materials | Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त

Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त

- राजकुमार जोंधळे

लातूर - तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील व्हरांड्यात तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. तिथे पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यावेळी जुगाराचे साहित्य, मोबाइल, दुचाकी व राेख रक्कम, असा एकूण ३ लाख ४० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून चाकूरचे सहायक पोलीस अधीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी येथे अचानक धाड टाकली.

याप्रकरणी पोलीस नाईक सूर्यकांत कलमे यांच्या फिर्यादीवरून २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ कांबळे करीत आहेत.

Web Title: Crime News: Gambling raids; A case has been registered against 22 people, three and a half lakhs have been seized along with gambling materials