शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:44 IST

Crime News : जून २०२५ मध्ये ही महिला गर्भवती राहिली, पण जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.

Crime News : गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाला आहे. वडोदरा येथे एका ४० वर्षीय महिलेवर सासऱ्याने आणि मेहुण्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेमागे तिच्याच पतीचा हात असल्याचे समोर आले आहे. पती आरोग्याच्या समस्येमुळे वडील होऊ शकत नव्हता, यामुळे त्या पतीने आपल्याच पत्नीला ब्लॅकमेल करुन सारसऱ्यासोबत संबंध ठेवायला लावल्याचे आरोप महिलेने केले आहेत. या प्रकरणी महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नानंतर काही आठवड्यांनी सासरच्यांनी प्रेगन्सीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात पतीच्या शुक्राणूंची संख्या खूप कमी असल्याचे सांगितले, त्यानंतर महिलेने मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला, पण सासरच्यांनी तो सल्ला नाकारला. यानंतर, सासरच्यांनी अत्याचार करण्यास सुरुवात केली.

महिलेला नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केले

जुलै २०२४ मध्ये एका रात्री, ज्यावेळी ती महिला तिच्या खोलीत झोपली होती, त्यावेळी तिचा सासरा खोलीमध्ये  आला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. पीडितेने विरोध केला तेव्हा त्याने पीडितेला मारहाण केली. महिलेने तिच्या पतीला सांगितले तेव्हा त्याने दुर्लक्ष केले. पतीने सांगितले की मुल हवे आहे, यावेळी पतीने महिलेला गप्प राहण्याची धमकी दिली. तसेच, पतीने तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या सासऱ्यांनी अनेक वेळा बलात्कार करूनही ती महिला गर्भवती राहिली नाही. डिसेंबर २०२४ मध्ये, तिच्या मेहुणीच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला . महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचली होती, परंतु भीती आणि धमक्यांमुळे ती गप्प राहिली.

पोलिसांत गुन्हा दाखल केला

जून २०२५ मध्ये ही महिला गर्भवती राहिली, पण जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने धाडस केले आणि पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासानंतर नवापुरा पोलिसांनी सासरा आणि मेहुणीच्या पतीविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पतीवर ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याचाही आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस