शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तुफान राडा! IPL मॅचवरून जेलमध्ये जोरदार हाणामारी, एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 12:07 IST

Crime News : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली.

नवी दिल्ली - आयपीएलला सुरुवात झाली असून मॅच पाहायला सर्वांनाच आवडतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. IPL मॅचवरून जेलमध्ये कैदी भिडले. एकमेकांच्या जीवावर उठले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नाही तर एक कैद्याने दुसऱ्या कैद्याचा डोळाच फोडल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील जेलमध्ये (Uttar Pradesh) आयपीएल मॅचवरून तुफान राडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली. 

मारहाणीत एका कैद्याचा डोळाच फोडला आहे. जखमी कैद्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून जेलरने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महोबा जिल्हा कारागृहातील प्रभारी जेलरनं दिलेल्या माहितीनुसार किशोर बॅरकमध्ये बंद असलेल्या दोन कैद्यांमध्ये आयपीएल मॅच टीव्हीवर पाहण्यावरून मारामारी झाली. यामध्ये चोरीच्या आरोपाखाली जवळपास 1 वर्षांपासून जेलमध्ये बंद असलेल्या दीपक या कैद्याच्या डोळ्याला दुखापत झाली. 

दीपकवर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरा आरोपी जयचंद पूर्णपणे सुरक्षित आहे.या जेलमध्ये कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही लावण्यात आला आहे. आयपीएल मॅचच्या वेळी सर्व कैदी टीव्ही बघत होते. त्याचवेळी दीपक आणि जयचंदमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे रूपांतर थोड्याच वेळात मारामारीमध्ये झाले. या प्रकरणाची माहिती समजताच जेलर आणि अन्य सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत हे भांडण सोडवले. 

जयचंदनं केलेल्या मारहाणीत दीपकच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दीपकवर सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. येत्या काळात या प्रकारचा कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग