Crime News: भिवंडीत जमिनीच्या वादातून बापाने केली मुलाची हत्या, बापलेकांना तालुका पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 20:30 IST2022-03-07T20:27:54+5:302022-03-07T20:30:47+5:30
Crime News: भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावात सख्या बापाने मुलाच्या मदतीने आपल्याच मोठ्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News: भिवंडीत जमिनीच्या वादातून बापाने केली मुलाची हत्या, बापलेकांना तालुका पोलिसांनी केली अटक
भिवंडी- भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावात सख्या बापाने मुलाच्या मदतीने आपल्याच मोठ्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काशिनाथ कचरू पाटील वय ५५ असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.तर कचरू गोविंद पाटील व गणेश कचरू पाटील अशी अटक केलेल्या वडील व भावाचा नाव आहे.
धामणगाव कशिवली या गावातील काशिनाथ पाटील व त्यांचे वडील कचरू पाटील व भाऊ गणेश यांच्यात मागील वर्षभरापासून जमिनीच्या वाटणी वरून वाद सुरू होता.त्यातच मयत काशीनाथ पाटील व त्यांचा मुलगा धनंजय हे दोघे शेतावर जाळणासाठी सर्पण लाकूडफाटा जमा करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी काशीनाथ पाटील यांचे वडील कचरू व भाऊ गणेश हे त्याठिकाणी येऊन यापूर्वी तू जीवानिशी वाचला पण आता नाही वाचू शकणार असे बोलून त्यास शिवीगाळ करीत मारहाणीस सुरवात केली .त्यानंतर गणेश याने पुतण्या धनंजय यावर कुऱ्हाडी सह लाठीकाठीने हल्ला करीत जखमी केले असता वडील काशीनाथ मुलाच्या बचावा साठी पुढे आले असता वडील कचरू यांनी कुऱ्हाडीने मुलाच्या डोक्यावर वार करून जखमी केले व त्यानंतर वडील व भावाने काशीनाथ यास मारहाण करून जबर जखमी केले .यानंतर मुलगा धनंजय याने जखमी रक्तबंबाळ झालेल्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटने नंतर भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे नातू धनंजय याने आजोबा कचरू पाटील व काका गणेश पाटील यांनी आपल्या वडिलांची हत्या केल्याची फिर्याद दिली असता पोलिसांनी हत्ये सह जबरी मारहाण केल्याप्रकरणी बाप लेका विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बारोट हे करीत आहेत.