शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; सासू-सासऱ्यांचा टोमण्यांना कंटाळून महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 8:25 PM

Crime News : सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर पती हैवान झाला असून सासरच्या मंडळींचं भयंकर रुप समोर आलं आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबातील महिलेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये हरियाणाच्या सोहना राम मंदिर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं ललिता नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली आहे. त्यांना दीड वर्षांचा मुलगादेखील आहे. ललिता उच्चशिक्षित होती आणि आर्किटेक्ट होती. मात्र तिला नोकरी मिळाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून ललिताला हुंड्यावरून घरामध्ये सतत टोमणे मारले जात होते. तिची नणंद आणि सासूकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने पंचायतीत तक्रारही केली होती.  परिस्थितीला कंटाळून तिने आयुष्य संपवण्याचा घेतला निर्णय 

पंचायतीत सासरच्या मंडळींना समज देण्यात आली होती आणि सूनेला हुंड्यासाठी त्रास न देण्याची ताकीदही देण्यात आली होती. मात्र तरीही आपल्या वर्तनात कुठलीही सुधारणा न झालेल्या मंडळींनी सुनेला टोमणे मारणं आणि तिच्याकडं हुंड्यासाठी तगादा लावणं सुरूच ठेवलं होतं. ललिताने आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती आईवडिलांनाही दिली होती. पंचायत आणि आईवडील या दोन्ही ठिकाणी सांगून देखील टोमणे थांबत नव्हते आणि छळ संपत नव्हता. या परिस्थितीला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 

ललिताच्या वडिलांनी हुंडाबळीची नोंदवली तक्रार 

राहत्या घरी गळफास घेऊन तिनं आपलं आय़ुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सून दार उघडत नसल्याचं लक्षात आल्यावर घरच्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा पंख्याला लटकलेला ललिताचा मृतदेह आढळला. ललिताच्या वडिलांनी हुंडाबळीची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी घरच्यांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस