संतापजनक! BP लो झाला म्हणून 'ती' रुग्णालयात गेली; उपचार करण्याऐवजी डॉक्टरने केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 13:10 IST2022-11-11T13:02:05+5:302022-11-11T13:10:28+5:30
Crime News : एक महिला ग्रामीण भागातून उपचारासाठीआली होती. डॉक्टरने तिला स्ट्रेचरवर झोपवलं अन् खूप कानाखाली मारल्या. डॉक्टरचं हे कृत्य पाहून उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले.

संतापजनक! BP लो झाला म्हणून 'ती' रुग्णालयात गेली; उपचार करण्याऐवजी डॉक्टरने केलं असं काही...
झारखंडच्या कोरबा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टराने महिला रुग्णावर ज्या पद्धतीने उपचार केले ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एक महिला ग्रामीण भागातून उपचारासाठीआली होती. डॉक्टरने तिला स्ट्रेचरवर झोपवलं अन् खूप थप्पड मारल्या. डॉक्टरचं हे कृत्य पाहून उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले. डॉक्टर नशेत असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेरवानी गावातील एका महिलेचं ब्लड प्रेशर लो झालं होतं. उपचार करायला महिला तिच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आली. रात्री रुग्णालयात आपत्कालीन उपचारासाठी सेवेत असलेले डॉक्टर, ज्यांनी या महिलेवर कशा पद्धतीने उपचार केले य़ाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डॉक्टरने सर्वप्रथम महिलेला स्ट्रेचरवर झोपवलं आणि तिच्या कानाखाली मारण्यास सुरुवात केली तिचे केसही जोरात ओढले.
महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी कोणाचंच ऐकलं नाही. माहितीनुसार हा डॉक्टर नशेत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनापर्यंत या घटनेची माहिती पोहोचली. या रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश मेश्राम यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"