संतापजनक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:27 PM2022-01-18T14:27:40+5:302022-01-18T14:31:32+5:30

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता नराधम पॉर्न फिल्म पाहत बसला होता.

Crime News delhi rape 8 year old girl accused watching porn video movie arrest time | संतापजनक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात खळबळ

संतापजनक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला खोट सांगून आपल्या जाळ्यात ओढलं आणि जंगलात नेलं. यानंतर जंगलात मुलीला जखमी अवस्थेत सोडून त्याने पळ काढला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता नराधम पॉर्न फिल्म पाहत बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर भागात ही संतापजनक घटना घडली आहे. 8 वर्षीय मुलगी ही मुळची बिहारची रहिवासी असून तिचं कुटुंब तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आलं आहे. याठिकाणी पीडित मुलीचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या एका बहिणीसोबत जवळच्या एका मंदिरात गेली होती. यावेळी पायी जात असताना, आरोपी देखील याठिकाणी आला. फूस लावून तो मुलीला जवळच्या एका जंगलात घेऊन गेला. याठिकाणी संधी साधून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर नराधमाने मुलीला घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर पीडित मुलगी जखमी अवस्थेत रात्री आठच्या सुमारास आपल्या घरी आली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.

मुलीच्या नातेवाईकांनी अलीपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता, आरोपी पॉर्न पाहात बसला होता. आरोपी हा एका हॉटेलमधील कामगार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News delhi rape 8 year old girl accused watching porn video movie arrest time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app