लाकूड कापण्याच्या मशीनने पत्नी अन् मुलांचा चिरला गळा अन् पतीनेही उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 19:03 IST2022-05-28T18:58:39+5:302022-05-28T19:03:36+5:30
Crime News : एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

लाकूड कापण्याच्या मशीनने पत्नी अन् मुलांचा चिरला गळा अन् पतीनेही उचललं टोकाचं पाऊल
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या पल्लावरममध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं. स्वत:लाही संपवलं. लाकूड कापण्याच्या इलेक्ट्रिक मशीनने त्याने तिघांचा गळा चिरला आणि स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेत प्रकाश (41), त्यांची पत्नी गायत्री (39) आणि दोन मुलं नित्यश्री (13), हरिकृष्णन (9) यांचा दुर्देवी अंत झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून कुटुंबावर कर्जाचं ओझं वाढत होतं. कर्जावरुन नेहमी घरात वाद होत होता. शनिवारी सकाळी घर आतून लॉक होतं. बराच वेळ झाला तरी कुटुंबाने दार उघडलं नसल्यामुळे शेजारच्यांनी खिडकीतून डोकावलं, तर चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. सर्वांचाच गळा चिरलेला होता.
शेजारच्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठले आहेत. तपासाअंती प्रकाश याने लाकूड कापण्याच्या मशीनने सर्वांचा गळा चिरला आणि यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.