Crime News: दक्षिणेतील प्रसिद्ध कॉमेडियनच्या पत्नीचा घरात सापडला मृतदेह, अभिनेत्यावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:57 IST2022-12-21T15:57:49+5:302022-12-21T15:57:57+5:30
Crime News : मल्याळम मनोरंजन जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन उल्हास पंडालम याची पत्नी आशा ही घरामध्ये मृतावस्थेमध्ये सापडली आहे.

Crime News: दक्षिणेतील प्रसिद्ध कॉमेडियनच्या पत्नीचा घरात सापडला मृतदेह, अभिनेत्यावर संशय
मल्याळम मनोरंजन जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन उल्हास पंडालम याची पत्नी आशा पठानमथिट्टा ही घरामध्ये मृतावस्थेमध्ये सापडली आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडला आहे. उल्हास याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने पोलीस ठाण्यात पत्नीच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तसेच आपली पत्नी बेपत्ता असल्याचा दावा केला होता. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, आशा हिचा मृतदेह तेव्हा सापडला जेव्हा उल्हासने ती बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी गेले होते. उल्हास पांडालमने पोलिसांनी सांगितले की, तो उठला आणि पहिल्या मजल्यावर गेला. तेव्हा तिथे त्याची दोन मुले होती. मात्र त्याची पत्नी नव्हती. त्यानंतर तो पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता.
दरम्यान, उल्हास पंडालमने घराच्या आजूबाजूला पत्नीचा शोध न घेता तो थेट पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी कसा काय गेला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आशाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत त्यांचा कुणावरही संशय नसल्याचे सांगितले.