Crime News: आईसह तिच्या ४ मुलांची निर्घृण हत्या, २८ वर्षा नंतर पहिला आरोपी अटकेत
By धीरज परब | Updated: December 30, 2022 15:06 IST2022-12-30T15:06:02+5:302022-12-30T15:06:28+5:30
Crime News: वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ ने १९९४ साली आई व तिच्या ४ लहान मुलांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी २८ वर्षांनी एका आरोपीस पकडण्यात यश आले आहे.

Crime News: आईसह तिच्या ४ मुलांची निर्घृण हत्या, २८ वर्षा नंतर पहिला आरोपी अटकेत
- धीरज परब
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ ने १९९४ साली आई व तिच्या ४ लहान मुलांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी २८ वर्षांनी एका आरोपीस पकडण्यात यश आले आहे. साहबलाल अमरनाथ चौहाण, ऊर्फ काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार (४३) रा. गांव नोनौटी, पो. बिरापट्टी, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश असे अटक आरोपीचे नाव आहे. आणखी २ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या भारवाड चाळ मध्ये १६ नोव्हेम्बर १९९४ रोजी हे हत्याकांड घडले होते.