शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! घरात घुसून नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हतबल भावाने हात जोडून विनवणी केली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:20 IST

Crime News : गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. झुंझुनं येथील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 14 वर्षीय मुलीला एका खोलीत बंद केलं. मुलीने खूप आरडाओरडा केला. याच दरम्यान तिचा भाऊ आला. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भावाने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला गेला नाही. यानंतर हतबल झालेल्या भावाने हात जोडून बहिणीला सोडण्यासाठी खूप विनवण्या केल्या. पण आरोपीने काहीच ऐकलं नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 3 ऑगस्ट रोजी बहीण घरी एकटीच होती. याच दरम्यान सोमेश नायक त्याच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसला. धमकी देत आरोपीने बहिणीला एका खोलीत बंद केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यावर तरुणाला बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर जवळपास दोन तास दरवाजाबाहेर उभं राहून भावाने बहिणीला सोडण्याची विनवणी केली पण आरोपीने ऐकलं नाही.

तरुणाच्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. त्यामुळे तो आपल्या मोठ्या बहिणीला बोलवण्यासाठी तिच्या घरी गेला. तो परत आला तेव्हा आरोपी फरार झाला होता. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने तरुणाला दिली आहे. घाबरलेल्या तरुणाने तीन दिवसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप

राजस्थानच्या बिजलिया परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सरकारी क्वार्टरमध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी दुष्कर्म आणि हत्येचा गंभीर आरोप केला आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर मुलाच्या नातेवाईकांनी आता आरोप केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका जुन्या सरकारी क्वार्टरमध्ये शिनाख्त परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान