शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! भाजपाच्या मोठ्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार; 6 महिने केलं लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 12:15 IST

BJP Sanjay Mishra : पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी असलेल्या भाजपा नेत्याला अटक करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा महिन्यांपासून महिलेचं लैंगिक शोषण सुरू होतं. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी असलेल्या भाजपा नेत्याला अटक करण्यात आली आहे. 

पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संजय मिश्रा (BJP Sanjay Mishra) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहे. मंगळवारी चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं देखील म्हटलं आहे. 

"आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी"

पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोप देखील खरा असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत होता. संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा काही आक्षेपार्ह फोटो काढले होते आणि संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचं लैंगिक शोषण करत होता.

"विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र"

अटक होण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी "माझे विरोधक मला निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण केलं आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणं हे विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला त्या हॉटेलातील 3 एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावे" असं देखील म्हटलं आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक