शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तीन ब्रँडची दारू घेऊन जाणारा ट्रक 20 फूट दरीत उलटला, पोलीस पोहोचेपर्यंत लोकांनी केली मनसोक्त लुटालुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:42 IST

अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची असल्याचे बोलले जात आहे.

बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची पोल-खोल होताना दिसत आहे. जमुई-मलयपूरच्या मुख्य मार्गावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पतनेश्वर चौकाजवळ उलटून 20 फूट खोल दरीत कोसळला. यादरम्यान दोन चालक ट्रकमधून उड्या मारून फरार झाले. तर अपघातात ट्रकची धडक बसल्याने एक वृद्ध जखमी झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटौना, मलयपूर मार्गे अवैध दारूची खेप  जाणार असल्यासंदर्भात एसपी प्रमोद कुमार मंडल यांना गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मलयपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कटौना बायपास वळणावर बॅरियर्स लावून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांनी ट्रक अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ट्रक बॅरियर तोडून जमुईच्या दिशेने धावू लागला. पोलिसांनी या ट्रकचा पाठलागही केला. मात्र ट्रकचा वेग अधिक असल्याने पतनेश्वर चौकातील टर्णवर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. आणि एका वृद्धाला डॉश देऊन तो लिंबाच्या झाडाला धडकून 20 फूट खोल दरीत उलटला.

दरम्यान, दारू तस्कर ट्रक मालकाचा शोध घेतला जात आहे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारliquor banदारूबंदी