शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

धक्कादायक! पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, Video मधून गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:48 IST

Crime News : सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं म्हणत तरुणाने विष घेतलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ ही तयार केला आणि सुसाईड नोट देखील लिहीली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओमधून त्याने गंभीर आरोप केला आहे. सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं म्हणत तरुणाने विष घेतलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ ही तयार केला आणि सुसाईड नोट देखील लिहीली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय यशपालचं 2018 मध्ये सोनीपत जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न झालं होतं. 

लग्नानंतर पती-पत्नीत सातत्याने खटके उडत असत. विविध कारणांमुळे वाद होत. शनिवारी यशपालची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी त्याच्यासोबत खूप मोठं भांडण केलं. ज्यामुळे पोलीस देखील त्यांच्या घरी आले होते. पोलिसांनी दोघांना देखील समजावलं. पण सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून यशपालने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. यशपालच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यशपालला एक अडीच वर्षांची मुलगी देखील आहे. 

मृत्यूसाठी पत्नी, सासू आणि काही नातेवाईक जबाबदार

यशपालने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार केला. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी आपली पत्नी, सासू आणि काही नातेवाईकांना जबाबदार धरलं आहे. तसेच आपल्या मृत्यूनंतर मुलीचा ताबा आपल्या कुटुंबीयांना द्या असा सल्ला देखील दिला आहे. तसेच व्हिडीओसोबत घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली आहे. यशपालच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नी आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची 'ती' ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या

राजस्थानमधील जालौरे जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच हैवान झाला असून आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या भावाला बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. बहिणीवर वडिलांनीच केलेला अत्याचार सहन न झाल्याने भावाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करुन जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या एका नातेवाईकाला सांगितला. नातेवाईकाने मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची एक ऑडिओ क्लिप तयार केली. ही ऑडिओ क्लिप मुलीच्या भावाने ऐकली. त्यानंतरच त्याने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत