शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या; घरापासून 20 मीटर अंतरावर आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:31 IST

Crime News : भाजपाच्या नेत्याची हत्या केली असून यामागे संपत्तीचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सुबेहा पोलीस ठाण्याच्या पंडित पुरवा गावात भयंकर घटना घडली. भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. घरापासून 20 मीटर दूर अंतरावर मृतदेह आढळला आहे. काही अज्ञात लोकांनी भाजपाच्या नेत्याची हत्या केली असून यामागे संपत्तीचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

भाजपा नेत्याच्या घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजपा नेत्याच्या पत्नीचं दोन महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे ते सध्या घरी एकटेच राहत होते. हरिहर सिंह असं 65 वर्षीय नेत्याचं नाव असून संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच त्यांच्या गळ्यावर काही खूणा सापडल्या. स्थानिक पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा अधिक तपास करत आहेत.

भाजपा नेत्याचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता. त्यामुळेच संपत्तीच्या हव्यासापोटी नातेवाईक किंवा गावातील काही लोकांनी हत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी कारमध्ये चार तरुणी होत्या आणि चौघीही दारूच्या नशेत होत्या.

भयंकर! मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू 

मद्यधुंद अवस्थेत तरुणीने डिलिव्हरी बॉयला उडवल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. विजय नगर येथून पार्टी करून कारमधून या तरुणी राजेंद्र नगरसाठी रवाना झाल्या होत्या. गार्गी माहेश्वरी नावाची तरुणी कार चालवत होती. ती एमआयजी कॉलनीत राहणारी आहे. तरुणी खूप फास्ट कार चालवित होती. यादरम्यान अचानक नियंत्रण सुटल्यामुळे तीनदा पलटी होऊन कार दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. याच दरम्यान देवीलाल नावाचा डिलिव्हरी बॉय कारखाली आला. देवीलाल याच्या अंगावरुन कार गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपाIndiaभारत