शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! ड्रग्स विकत घेण्यासाठी बापाने 40 हजारात मुलाला विकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:09 IST

Crime news : ड्रग्ससाठी एका बापाने आपल्या मुलाला 40 हजार रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे.

नवी दिल्ली - आसाममध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मोरीगन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्ससाठी एका बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. गुवाहाटीपासून जवळपास 80 किमी दूर असलेल्या लहरीघाट गावात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा खुलासा झाला आहे. तक्रारीनुसार, आरोपी अमीनुल इस्लाम याने आपल्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या व्यक्तीला विकलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल होताच अधिक वेगाने तपास सुरू केला.

अमीनुल इस्लाम आणि साजिदा बेगम या दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. मुलाची आई रुक्मिना बेगम नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरी राहात होती. ड्रग्सच्या सेवनावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे तिने आपल्या वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला. एक दिवस आरोपी अमीनुल तिच्या घरी आला आणि मुलाचं आधारकार्ड बनवायचं आहे, असं सांगून घेऊन गेला. मात्र दोन-तीन दिवस मुलाला परत पाठवलं नसल्याने रुक्मिनाला थोडा संशय आला. मुलाला विकल्याची माहिती मिळताच तिला मोठा धक्काच बसला. 

अखेर 5 ऑगस्टला तिने पोलिसात तक्रार दिली आणि मुलाला ताब्यात घेतलं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त  दिले आहे. तक्रारीनुसार, मोरीगावच्या लहरीघाट गावात साजिदा बेगमला मुलगा विकल्याचं सांगितलं. ड्रग्स विकत घेण्यासाठी 40 हजारांना विकलं. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तपास करत मुलाला साजिदाच्या ताब्यातून सोडवलं आणि आईकडे सोपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू 

देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी कारमध्ये चार तरुणी होत्या आणि चौघीही दारूच्या नशेत होत्या. मद्यधुंद अवस्थेत तरुणीने डिलिव्हरी बॉयला उडवल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAssamआसामArrestअटक