Crime News: फटाके फोडण्यावरून वाद, जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने खून
By सुनील पाटील | Updated: October 25, 2022 23:25 IST2022-10-25T23:23:06+5:302022-10-25T23:25:48+5:30
Crime News: फटाके फोडण्याच्या वादातून तांबापुरात संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय १९, रा.तांबापुरा) या तरुणाचा मंगळवारी रात्री दहा वाजता धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे.

Crime News: फटाके फोडण्यावरून वाद, जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने खून
- सुनील पाटील
जळगाव - फटाके फोडण्याच्या वादातून तांबापुरात संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय १९, रा.तांबापुरा) या तरुणाचा मंगळवारी रात्री दहा वाजता धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे. संजयसिंग याला वाचविण्यासाठी आलेल्या वडील प्रदीपसिंग, काका बलवंत सिंग व बग्गा सिंग टाक यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे.
मोनुसिंग, सोनुसिंग, मोनसिंग बावरी या तिघांनी हा हल्ला केल्याची माहिती प्रदीपसिंग व बग्गा सिंग यांनी दिली. या घटनेनंतर सोनू सिंग याच्या वडीलांसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी दोन्ही गटात दगडफेक झाली. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी रात्री संजय सिंग यांच्या घरासमोर सोनू सिंग व त्याच्या भावाने फटाके फोडले होते. माझ्या घरासमोर फटाके फोडू नको असे म्हणत संजयने त्यांना विरोध केला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद मंगळवारी रात्री दहा वाजता उफाळून आला. त्यातून संजयसिंग याच्यावर ते प्राणघातक हल्ला झाला. रात्री अकरा वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही तणावाचे वातावरण होते.