शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ओळख झाली, अत्याचाराचा व्हिडीओ शेअर करून 'त्याने' बदनामी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 21:50 IST

Crime News : पीडित महिलेशी ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर त्याने पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.

धनकवडी - महिलेवर बलात्कार करुन त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग शाळेच्या ग्रुपवर पाठवणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या चोवीस तासात मुसक्‍या आवळण्यात आल्या असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश असुलाल डांगी, वय ४१ वर्षे, राहणार शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि डांगी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्यांची पुन्हा ओळख झाली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक व्हॉटसअप ग्रुपही केला होता. या माध्यमातून त्याने पुन्हा पीडित महिलेशी ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर त्याने पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. या संबंधाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करुन ते शाळेच्या ग्रुपवर पाठवले. यामुळे पीडितीचे मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.

पीडितेने तक्रार दिल्यानंतर दिनांक २५ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या ठावठिकाणांचा सहकारनगर पोलीस ठाणेचे तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सुधीर शिवाजीराव घाडगे व त्यांचे पथक पोलीस नाईक संदीप जालिंदर ननवरे, पोलीस नाईक प्रकाश चंद्रकांत मरगजे, यांनी माहिती काढली तर पोलीस शिपाई प्रदिप जिजाबा बेडिस्कर यांनी तांत्रिक विश्लेषण केले. मात्र आरोपीने आपला मोबाईल बंद करून पोलिसांना गुंगारा देत असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला चोवीस तासात अटक करण्यात आली. आरोपी हा सेव्हन लव्हज चौकात असलेल्या एका कंपनीत सेल्स एक्‍झिक्‍युटीवचे काम करतो. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस