एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 10:35 PM2021-03-29T22:35:26+5:302021-03-29T22:36:02+5:30

Crime News : मुंबईसह मीरा भाईंदर व नालासोपारा येथे अशाप्रकारचे ७ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडून २६ एटीएम कार्ड जप्त केली आहेत.

Crime News : Accused arrested for swindling money by ATM card fraud | एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक 

एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक 

Next

मीरारोड - एटीएम कार्डद्वारे पैसे काढताना मदत करण्याच्या नावाखाली पासवर्ड हेरून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून पैसे लुबाडणाऱ्या सराईत भामट्यास नवघर पोलिसांनी अटक केली आहे . त्याने मुंबईसह मीरा भाईंदर व नालासोपारा येथे अशाप्रकारचे ७ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडून २६ एटीएम कार्ड जप्त केली आहेत. (Crime News : Accused arrested for swindling money by ATM card fraud)

भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर भागातील एटीएममधून तक्रारदार हे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तक्रारदार हे पैसे काढत असताना त्यांच्याकडून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड काढून घेत बनावट एटीएम कार्ड हाती टेकवले. तसेच पैसे काढताना पासवर्ड हेरला. त्यानंतर आरोपीने चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे अन्य एटीएममधून ४० हजार रुपये काढून घेतले होते. 

नवघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संदीप ओहोळ सह रवींद्र भालेराव , युनूस गिरगावकर , निलेश शिंदे , संदीप जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला . 

तांत्रिक विश्लेषण,  माहितीच्या आधारे आणि आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल यावरून पोलिसांनी नालासोपारा येथे राहणाऱ्या आरिफ अली शेख याला अटक केली. शेख याच्याकडे केलेल्या तपासातून त्याने भाईंदर, नया नगर, तुळींज, कांदिवली, एमएचबी कॉलनी, ओशिवरा, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लबाडीने एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून पैसे उकळल्याचे उघडकीस आले. 

पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची २६ एटीएम कार्ड, गुह्यात वापरलेली दुचाकी व ४० हजार रोख असा मुद्देमाल हस्तगत केला आहे . त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता पोलीस तपासून पहात आहेत. नागरिकांनी एटीएम मधून पैसे काढताना आजूबाजूला कोणा त्रयस्थ माणसांना पिन क्रमांक व एटीएम देऊ नये. फोन वरून कोणालाही तुमचा एटीएम क्रमांक, पिन क्रमांक व खाते क्रमांक सांगू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी केले आहे. 

Web Title: Crime News : Accused arrested for swindling money by ATM card fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.