Crime News: तरुणाने गर्लफ्रेंडला दुसऱ्या तरुणासोबत फिरताना रंगेहात पकडलं, त्यानंतर भररत्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:46 IST2022-03-30T15:41:39+5:302022-03-30T15:46:01+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे एक फूल दोन माळी प्रकारातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जोगेंदर सिंह पेट्रोल पंपासमोर एका गर्लफ्रेंडपायी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Crime News: तरुणाने गर्लफ्रेंडला दुसऱ्या तरुणासोबत फिरताना रंगेहात पकडलं, त्यानंतर भररत्यात...
भोपाळ - मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे एक फूल दोन माळी प्रकारातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जोगेंदर सिंह पेट्रोल पंपासमोर एका गर्लफ्रेंडपायी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. उत्तर प्रदेशमधील लखनौमधील दोन तरुण आपापल्या गर्लफ्रेंडसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी छतरपूर येथे आले होते. या दोन तरुणींमधील एकीचे उत्तर प्रदेशमधील महोबा येथील अन्य एका तरुणासोबत अफेअर सुरू होते.
दरम्यान, महोबा येथील तरुणाला जेव्हा समजले की, त्याची गर्लफ्रेंड कुठल्यातरी अन्य तरुणासोबत गेली आहे तेव्हा तो पाठलाग करत छतरपूरमध्ये पोहोचला. त्याने इथे भररस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्या कारमधून त्याची गर्लफ्रेंड जात होती ती कार त्याने अडवली, तसेच त्या कारमध्ये बसलेल्या तरुणासोबत मारहाण सुरू केली. त्यामध्ये एक तरुण जखमी झाला. महोबा येथील तरुणाने रुग्णालय आणि पोलीस चौकीमध्येही गोंधळ घालता.
मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यानची आहे. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. येथेही गोंधळ झाला. यादरम्यान, दोन्ही तरुणी त्यांच्या मित्रांना सोडून कुठेतरी निघून गेल्या आहे. याबाबत सचिन तिवारीने सांगितले की, आम्ही दोघेही जन्मदिन साजरा करण्यासाठी लखनौ येथे आलो होते. दोन्ही तरुणीही आमच्यासोबत होत्या. विक्कीने कुठल्याही चर्चेविना मारहाण सुरू केली. त्याने कुठल्याही पद्धतीने पोलीस कारवाई किंवा तक्रार करण्यास मनाई केली. .