Crime News: मध्यरात्री घरात एकटी पाहून महिलेवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना
By दत्ता यादव | Updated: December 21, 2022 14:03 IST2022-12-21T14:03:22+5:302022-12-21T14:03:58+5:30
Crime News: एका २६ वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून एका तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित संशयित तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News: मध्यरात्री घरात एकटी पाहून महिलेवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना
सातारा - एका २६ वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून एका तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित संशयित तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला २६वर्षांची आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ती महिला रात्री घरात एकटी झोपली होती. त्यावेळी रात्री दोनच्या सुमारास एका तरूणाने तिच्या घराचा दरवाजा वाजविला. पीडित महिलेने दरवाजा उघडताच तिला आतमध्ये ढकलून दिले. त्यानंतर त्याने आतून दार लावून पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. भीतीमुळे त्या महिलेने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मंगळवारी रात्री संबंधित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्या तरूणाच्या विरोधात तक्रार दिली. आरोपी तरूणाला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.