Crime News: पाेलिस असल्याची बतावणी करत भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ठाकुर्लीतील धक्कादायक घटना
By मुरलीधर भवार | Updated: January 28, 2023 15:48 IST2023-01-28T15:47:13+5:302023-01-28T15:48:13+5:30
Crime News: पाेलिस असल्याची बतावणी करून एका अल्पवयीन विद्यार्थींनीवर दाेन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाकूर्ली खाडी किनारा परिसरात घडली आहे.

Crime News: पाेलिस असल्याची बतावणी करत भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ठाकुर्लीतील धक्कादायक घटना
- मुरलीधर भवार
डाेंबिवली- पाेलिस असल्याची बतावणी करून एका अल्पवयीन विद्यार्थींनीवर दाेन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाकूर्ली खाडी किनारा परिसरात घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनी ही तिच्या मित्रासाेबत खाडी किनारी फिरण्यासाठी गेली हाेती. तेव्ही ही घटना घडली. या प्रकरणी डाेंबिवलीतील विष्णूनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बलात्कार करुन पसार झालेल्यांचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी पाच तपास पथके तयार केली आहेत.
काल शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थींनी तिच्या एका मित्रासाेबत ठाकूर्ली स्टेशन जवळच असलेल्या खाडी किनारी गेली हाेती. त्याठिकाणी दाेन जण आले. त्यांनी पाेलिस असल्याचे सांगून अल्पवयीन विद्यार्थींनी आणि तिच्या साेबत असलेल्या मित्राला दमावर घेतले. तुम्ही इथे का आला असे सांगून दाेघांच्या पालकांना ही बाब सांगितली जाईल असे सांगून अल्पवयीन विद्यार्थींनीला एकाने काही अंतरावर नेले. त्याठिकाणी साहेब उभे आहेत असे सांगितले. तर दुसऱ्याने तिच्या मित्राला दुसऱ्या ठिकाणी नेले. याच दरम्यान पहिल्या आराेपीने मुलीवर बलात्कार केला. दुसरा आराेपी मुलीच्या मित्राला साेडून पुन्हा घटनास्थळी आला. त्यानेही त्या विद्यार्थींनीवर बलात्कार केला. पिडीत विद्यार्थिनीने घडला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.
आधी हा प्रकार डाेंबिवली रेल्वे पाेलिसांकडे गेला हाेता. ही घटना विष्णूनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हे प्रकरण रेल्वे पाेलिसांनी विष्णूनगर पाेलिसांकडे पाठविले. विष्णूनगर पाेलिसांनी या प्रकरणात रात्री १२ वाजता गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार करुन पसार झालेल्या दाेन आराेपींचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी पाच तपास पथके नेमली आहेत. पिडीत विद्यार्थीनी १२ वीच्या वर्गात शिकत आहे. ही घटना भर दिवसा घडल्याने डाेंबिवली ठाकूर्ली परिसरात एकच खळबळ माजली आहे.