खामगाव (बुलडाणा) : एका शिक्षकाने स्वत: प्रेमकविता लिहून ती एका शिक्षिकेच्या नावाने साेशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील एका गावात समाेर आला. विवाहित शिक्षिकेने खामगाव ग्रामीण पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर ५२ वर्षीय शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राेहिदास रामदास राठाेड असे आराेपी शिक्षकाचे नाव आहे. राठोड याने प्रेमकविता लिहून ती एका विवाहित शिक्षिकेच्या नावाने व्हायरल केली. तसेच शिक्षिका कर्तव्यावर असताना तिच्याकडे एकटक पाहून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Crime News: प्रेमकविता व्हायरल केल्याने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:52 IST