भयंकर! बेरोजगार असण्यासोबतच दोन्ही मुलांना दारूचं व्यसन; कंटाळलेल्या आईने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:45 IST2022-02-17T15:16:57+5:302022-02-17T15:45:55+5:30
Crime News : महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती.

भयंकर! बेरोजगार असण्यासोबतच दोन्ही मुलांना दारूचं व्यसन; कंटाळलेल्या आईने उचललं टोकाचं पाऊल
नवी दिल्ली - आत्महत्या प्रकरणांकडे नीट पाहिलं तर अनेक प्रकरणात कौटुंबिक कारणं समोर आली आहेत. कुटुंबातून वाढलेला तणाव इतका जास्त होतो की, लोक आपलं आयुष्यचं संपवतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना दिल्लीमध्ये घडली आहे. एका आईने मुलांना कंटाळून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय एका नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ख्याला भागातील 50 वर्षीय महिलेने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागे तणावाचं कारण समोर आलं आहे. महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती. यामुळे दररोजच्या भांडणाला वैतागून महिलेने आत्महत्या केली. मृत महिलेचं नाव निर्मला आहे. ती शिवणकाम करून घर चालवित होती. मात्र तिची मुलं काहीच काम करीत नव्हते.
घरची परिस्थिती बेताची असून घरामध्ये आर्थिक चणचण भासत होती. महिला मानसिकदृष्ट्या तणावात होती. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता निर्मला यांनी नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त प्रशांत गौतम यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. सोबतच या प्रकरणी कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.