नागभीड (चंद्रपूर) : दारूची वाहतूक करणाऱ्यांचा पाठलाग करणारे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपती किसन चिडे यांना दारू माफियाने वाहनाखाली चिरडून मारले.ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी नागभीड तालुक्यात मौशीजवळ घडली. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून तोरगावमार्गे मौशी रस्त्याने दारूची अवैध वाहतूक होते.याची माहिती छत्रपती चिडे यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक ए. एस. मलकापुरे, संदीप कोवे, पितांबर खरकाटे आणि रामकृष्ण बोधे यांना घेऊन ते मौशीकडे निघाले. माफियांची गाडी दिसताच पाठलाग सुरू केला. गोसेखुर्द कालव्याजवळ समोरून येणाºया ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे खासगी वाहनातून पाठलाग करणारे पोलीस खाली उतरले व दारूची वाहतूक करणाºया गाडीकडे पायी चालू लागले. तेवढ्यात माफियांनी आपले वाहन रिव्हर्स घेऊन पोलिसांच्या अंगावर आणले.तिघे जण चपळाईने बाजूला झाले, पण चिडे यांच्या अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.
दारूमाफियांनी ठाणेदाराला चिरडले; तिघे पोलीस अधिकारी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 07:07 IST