शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:38 IST

Crime News 12 year old girl killed after being allegedly raped in jungle : एका जंगलात एका 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 55 किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलात एका 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. झाडावर लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. 

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगी सकाळी घरामध्येच होती. त्यानंतर तिने वडिलांना आपण आईसोबत जंगलात जात असल्याचं सांगितलं. यानंतर ती घरातून निघून गेली. वडिलांना वाटलं मुलगी आईसोबत आहे. तिच्यासोबत ती जंगलात गेली आहे. मात्र आईला याबाबत काहीच कल्पना नव्हती. मुलीची आई जंगलातून परतली तेव्हा वडिलांनी तिच्याकडे मुलीची चौकशी केली. तेव्हा मुलगी आपल्यासोबत आलीच नसल्याचं आईने सांगितलं. यानंतर घाबरलेल्या पालकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली पण ती मुलगी कुठेच सापडली नाही. 

गावकऱ्यांदेखील मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलीचा मृतदेह हा जंगलामध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचे हात-पाय बांधले होते. तसेच ओढणीच्या साहाय्याने तिचा मृतदेह हा झाडाला लटकवला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गावात राहणाऱ्या एका तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू