शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

तारापूर येथील अनधिकृत रसायनाच्या साठ्याप्रकरणी गुन्हा; पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:12 AM

वेंगणी गावात करण्यात आला होता साठा

बोईसर : तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील वेंगणी गावात अनधिकृतपणे केलेल्या रसायनाच्या साठ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी पाठविलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत सदर साठ्यात मिक्स सॉलवंट व ज्वालाग्रही रसायन असल्याचे समोर आले होते.

तारापूरजवळील वेंगणी गावातील एका शेतात १९ जून रोजी सकाळी एका ट्रकमधून रसायन भरलेले २०० लिटर क्षमतेचे पिंप उतरवले जात असल्याची माहिती नागरिकांनी तारापूर पोलिसांना दिल्यानंतर तारापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर विभागाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना सदर साठ्यातील रसायनांचे नमुने घेऊन तपासणी करण्यासंदर्भात पत्र दिले होते.

दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी पालघर पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळी भेट देऊन सदरच्या अनधिकृत कृतीबाबत गुन्हा दाखल करण्याबाबत व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी या ठिकाणी संयुक्तरीत्या भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दिले होते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील अधिकाºयांनी वेंगणी येथील रसायनांचे नमुने घेऊन तपासणी केली. त्यामध्ये मिक्स सॉलव्हंट असून एक घटक हा अतिज्वालाग्राही असल्याचे तसेच त्याच्या वाफा हवेपेक्षा जड असल्याचे समोर आले होते. हा साठा एमआयडीसी हद्दीच्या बाहेर अधिसूचित नसलेल्या प्लॉटवर केलेला असून याकरिता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले होते.

टॅग्स :Policeपोलिस