शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सायरनवरून लागला गुन्ह्याचा छडा; महिलांना अश्लील फोन करणारा अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 15:45 IST

सायरनवरून लागला छडा : गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई 

ठळक मुद्दे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे. वापरलेले सिमकार्ड देखील पोलिसांनी जप्त केले आहे. संतोष देवासी (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो नेरुळ सेक्टर २० चा राहणारा आहे.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : महिलांना फोन करून त्यांच्यासोबत अश्लील संभाषण तसेच मॅसेज करणाऱ्याला पोलिसांनीअटक केली आहे. एका महिलासोबत तो बोलत असताना रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज आला होता. त्याद्वारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे. 

संतोष देवासी (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो नेरुळ सेक्टर २० चा राहणारा आहे. त्याच्याविरोधात वाशी, एनआरआय तसेच रबाळे पोलिसठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संतोष हा महिलांचे नंबर मिळवून त्यांना फोन करून अश्लील संभाषण करायचा. तसेच अश्लील मॅसेज देखील वापरायचा. मात्र याकरिता तो स्वतंत्र सिमकार्डचा वापर करायचा. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर वाशीतील एका महिलेला तो जेव्हा फोन करायचा तेव्हा रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज यायचा. सदर महिलेने याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपासाकरिता गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, उपनिरीक्षक राणी काळे यांचे पथक तयार केले होते. त्यांनीच तांत्रिक तपासातून संतोष देवासी याची माहिती मिळवली. चौकशी दरम्यान तो नेरुळच्या अपोलो रुग्णालयात रुग्णवाहिकेवर मदतनीस म्हणून कामाला असल्याचे समोर आले. तर रुग्णवाहिकेवर कार्यरत असतानाच तो रुग्णालयातील महिला रुग्ण तसेच महिला कर्मचारी यांचे मोबाईल नंबर मिळवायचा. यानंतर त्यांना वेगळ्या नंबरवरून फोन करून अश्लील संभाषण करायचा. यावेळी रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज लक्षात घेऊन वाशीतील तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती दिली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, चौकशीत त्याने अनेक महिलांना असे फोन करून त्रास दिलेला असल्याचे उघड झाले. त्याकरिता वापरलेले सिमकार्ड देखील पोलिसांनी जप्त केले आहे. 

 

टॅग्स :ArrestअटकMolestationविनयभंगhospitalहॉस्पिटलWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई