शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

रोहिणी खडसे यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 5:42 PM

Rohini Khadse attack : मुक्ताईनगर: शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चौघांचा समावेश 

मुक्ताईनगर :  माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी २७ रोजी रात्री हल्ला झाला होता. या  प्रकरणात शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरुद्ध मंगळवारी २८ रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेना विधान सभाक्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.

जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका रोहिणी खडसे -खेवलकर यांनी याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सोमवारी रात्री चांगदेव येथील हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास मानेगाव फाट्या पासून अर्ध्या किमी अंतरावर त्यांच्या कारसमोर तीन मोटरसायकल आडव्या झाल्या आणि रास्ता अडविला. यावेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले, त्यात  सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्याबाजूने येऊन माझ्याकडे पिस्तूल रोखले. चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार होती तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी गाडीवर हल्ला चढविला. यात गाडीची काच फुटली. अंधारात त्यांच्या सोबतचे अन्य चार अनोळखी  आरोपीही या हल्ल्यात सामील होते, असे फिर्यादीत नमूद आहे. जास्त वेळ न दवडता हल्लेखोरांनी पळ काढला होता.

या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात भादवि ३०७, ३४१, ४२७, १४१, १४३, १४७,१४८,१४९ आर्म ॲक्ट २५(३),२५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

मी घाबरणार नाही-  रोहिणी खडसेप्राणघातक  हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती माध्यमांसमोर कथन केली.  मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहिल. बोदवड नगरपंचायती पासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्यातूनच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केल्याचे त्या म्हणाल्या.

हा कुठला शिवसेनेचा आमदार -  एकनाथ खडसेआमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर खडसेनी जोरदार हल्ला चढविला.  ते म्हणाले की, हा कुठला शिवसेनेचा आमदार... शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि रवींद्र पाटील यांच्या त्यागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर हा निवडून आला. एकीकडे म्हणतो मी सेनेचा जिल्हा प्रमुख आणि दुसरी कडे म्हणतो मी अपक्ष आमदार ज्यांच्या बळावर आमदार निवडून आला आता त्यांनाचं छळतोय. भाजप आणि सेना युती असतांना गद्दारी करून अपक्ष निवडून आला आहे.

भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध -  चंद्रकांत पाटीलदरम्यान सोमवारी रात्री झालेल्या या प्राण घातक हल्ल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.  हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत मुक्ताईनगरच्या पावन परंपरेला यामुळे गालबोट लागले असून याचा आपण तीव्र निषेध करत असल्याचे निवेदन त्यांनी जारी केले आहे. तर  या हल्ल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण  विधानसभेत करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

सखोल तपास सुरू - पोलीस अधीक्षक मुंडे रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्याद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेली तीन नावे शिवसेना पक्षाशी निगडित आहे ही बाब सर्व श्रुत आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRohini Khadseरोहिणी खडसेPoliceपोलिसchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना