शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोव्हीड रुग्णालयात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ करणाऱ्या युट्युबवर चॅनल चालवणाऱ्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 20:50 IST

Crime Case : एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह  ८ जणांविरुद्ध  तब्बल २५ कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देतपासणीवेळी आफताब सह सोबतच्या लोकांनी  आरडा ओरडा चालवला. आफताबने तर डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ व दमदाट्या चालवल्या. उपचार केंद्रात आणि डॉक्टरांच्या कार्यालयात घुसून आफताब व त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महाजन कोविड उपचार केंद्रात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ , धमक्या देऊन गोंधळ घालणाऱ्या एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह  ८ जणांविरुद्ध  तब्बल २५ कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

महापालीकेने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रमोद महाजन सभागृहात कोविड उपचार केंद्र  सुरु केलेले आहे . ह्या ठिकाणी २०६ खाटा असून सध्या रुग्ण संख्या मोठी असल्याने सदर उपचार केंद्र हे पूर्णपणे भरलेले आहे . खाटा रिकामी नसल्याने रुग्णास अन्यत्र न्यावे लागते. 

 

बुधवारी रात्री ८ च्या सुमारास युट्युब वर चॅनल चालवणारा आफताब खान हा इम्तियाज खान व अन्य ६  ते ७ लोकांसह बळजबरी रुग्णवाहिकेसह कोरोना उपचार केंद्राच्या आवारात शिरला . रुग्णवाहिकेतील रुग्णाची त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ. गौतम टाकळगावकर , डॉ. जय छटपार व डॉ .  नितीन जाधव आदींनी तपासणी सुरु केली . रुग्णाचा दाखल करण्या आधीच मृत्यू झाला होता . तपासणीवेळी आफताब सह सोबतच्या लोकांनी  आरडा ओरडा चालवला. 

 

आफताबने तर डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ व दमदाट्या चालवल्या. उपचार केंद्रात आणि डॉक्टरांच्या कार्यालयात घुसून आफताब व त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला.  मास्क सुद्धा त्यांनी घातले नव्हते . डॉक्टरांच्या कामात अडथळा आणला . आदी प्रकरणी डॉ. टाकळगावकर  फिर्यादी वरून नघर पोलीस ठाण्यात विविध कायदे नियमातील तब्बल २५ कलामांखाली आफताब व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलmira roadमीरा रोडPoliceपोलिस