Cricketers, wives of actors are also addicted to drugs | क्रिकेटपटू, कलाकारांच्या बायकाही ड्रग्जच्या विळख्यात

क्रिकेटपटू, कलाकारांच्या बायकाही ड्रग्जच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेटपटू व बॉलीवूडमधील कलाकारांच्या बायकाही अमली पदार्थांचे सेवन करतात. कोलकाता नाइट रायडर्सच्या एका पार्टीत क्रिकेटपटू आणि कलाकारांच्या बायकांना अमली पदार्थ घेताना पाहिल्याचा दावा अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे.


एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन म्हणाली की, एका सामान्यानंतर आयोजित या पार्टीत केकेआरचे खेळाडू होते, त्यांच्या बायका, संघाचे मालक आणि त्यांचे काही जवळचे कलाकार मित्रही उपस्थित होते. मी वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रसाधनगृहात या बायका अमली पदार्थ घेत होत्या. हेच दृश्य कदाचित पुरुषांच्या वॉशरुममध्येही असेल.


बॉलीवूडच्या बाहेरील लोकांना कदाचित असे वाटेल की, शौक म्हणून अमली पदार्थ घेतले जातात. प्रत्यक्षात त्याच्याशिवाय ही मंडळी कामच करू शकत नाहीत, असेही शर्लिन म्हणाली. या पार्टीत कोण कोण होते, हे मला पक्के माहिती आहे. वेळ आल्यावर सर्वांची नावे उघड करणार असल्याचे सांगतानाच अमली पदार्थांचे जाळे लोकांसमोर यायला हवे. त्यानंतरच हिंदी चित्रपटसृष्ट स्वच्छ होईल, असेही ती म्हणाली.

दीपिकाची आज चौकशी
तीन वर्षांपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स बजावले असून तिची शुक्रवारी चौकशी होणार आहे.
तिने व तिचा पती अभिनेता रणवीरसिंगने गुरुवारी दिवसभर त्यांच्या ‘लीगल’ टीममधील ज्येष्ठ वकिलाशी चर्चा केली.
दीपिका गोव्यातून त्यांच्या संपर्कात होती. तिने यंत्रणेला चौकशीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे पत्र दिले आहे.

Web Title: Cricketers, wives of actors are also addicted to drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.