इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करुन अश्लिल फोटो केले व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:50 IST2019-01-30T18:49:13+5:302019-01-30T18:50:51+5:30
इन्स्टाग्राम अॅपवर तरुणीशी ओळख केली त्यानंतर तरुणीचे बनावट अकाऊंट तयार करुन तिचे अश्लिल फोटो तयार करुन व्हायरल केले.

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करुन अश्लिल फोटो केले व्हायरल
पिंपरी : इन्स्टाग्राम अॅपवर तरुणीशी ओळख केली. त्यानंतर तरुणीचे बनावट अकाऊंट तयार करुन तिचे अश्लिल फोटो तयार करुन व्हायरल केले. हा प्रकार २३ जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला.याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत चंद्रशेखर मेश्राम (रा. श्रीनगर, गोंदिया, महाराष्ट्र) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेश्राम याने पीडीत तरुणीचे इन्स्टाग्राम या सोशल साइटवर अकाऊंट बनवले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत पीडित तरुणीचे अश्लिल फोटो बनवले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन तरुणीची बदनामी व विनयभंग केला. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हिंगोले करत आहेत.