गरबादरम्यान अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:13 IST2018-10-15T21:13:00+5:302018-10-15T21:13:29+5:30
पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले.

गरबादरम्यान अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून हाणामारी
मीरा रोड - मीरारोडच्या शांती पार्क भागातील गरबा खेळून कुटुंबियांसोबत परतणाऱ्या एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या छेड काढण्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मीरारोड पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे .शांती पार्क परिसरात गरबा खेळून 13 वर्षाची मुलगी आपला मामा व अन्य नातलगांसह घरी जात होती. त्यावेळी वाटेतच एका 29 वर्षीय तरुणाने तिची छेड काढल्याचा संशय मामाला आला. त्याने जाब विचारला असता वादविवाद होऊन मामाला मारहाण करण्यात आली. तर मामाने देखील वडील व नातलगासह तो तरुण राहत असलेल्या इमारतीत जाऊन काठीने त्या तरुणाला मारहाण केली. पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे . तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले.