हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

By पूनम अपराज | Published: October 15, 2020 10:02 PM2020-10-15T22:02:40+5:302020-10-15T22:03:30+5:30

Death Sentence : आरोपींनी ही घटना घडवून आणल्यानंतर मुलीचा मृतदेह पेंढाच्या ढीगात लपविला होता.

Court sentences convicts to death in 2018 rape and murder case | हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

Next
ठळक मुद्दे हापूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात आरोपींना बलात्कारानंतर हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात २ वर्षांपूर्वी एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश वीणा नारायण यांनी दोन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली. आरोपींनी ही घटना घडवून आणल्यानंतर मुलीचा मृतदेह पेंढाच्या ढीगात लपविला होता.

हत्येला विरोध दर्शवताना आरोपींनी मुलाच्या भावाच्या गळा कापला होता. दोन घरकाम करणाऱ्यांनी ही भीषण घटना घडवून आणली. हापूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) वीणा नारायण यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देताना पीडित कुटुंबीयांमध्ये समाधानी वातावरण पसरले. हापूरच्या पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

१२ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्काराची घटना दोन वर्षापूर्वी हापूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन परिसरात घडली होती. घरी घरकाम करणाऱ्या दोन नोकरांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती, जेव्हा मुलीने निषेध केला तेव्हा आरोपीने मुलीची हत्या केली घरात बनवलेल्या पेंढाच्या खोलीत मृत मुलीला पोत्यात लपविले.


परंतु या संपूर्ण घटनेची साक्ष मुलीच्या दहा वर्षाच्या भावाने दिली आणि त्यानंतर आरोपीने मुलाच्या दहा वर्षाच्या भावाची गळा कापला होता. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन होते. या प्रकरणात गुरुवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) वीणा नारायण यांनी दोन्ही आरोपी अंकुर तेली आणि सोनू उर्फ पव्वा यांना फाशीची शिक्षा सुनावली.


एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये बलात्कारानंतरच्या हत्येची प्रकरणे समोर येत असताना, या प्रकरणात, हापूर कोर्टाच्या विशेष न्यायाधीश वीणा नारायण यांनी मुलीला बलात्कारानंतर खून प्रकरणातील दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हापूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात आरोपींना बलात्कारानंतर हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 

Web Title: Court sentences convicts to death in 2018 rape and murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.