शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 19:59 IST

Honor Killing Crime News : झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने ऑनर किलींगच्या (honor killing)एका प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना आणि काका-काकींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

रांची - झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने ऑनर किलींगच्या (honor killing)एका प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना आणि काका-काकींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी कोडरमा जिल्ह्यातील चंदवारा ठाणे क्षेत्रातील मदनगुडीमध्ये २० वर्षीय सोनी कुमारी या तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  (Court order death sentenced to four accused of honor killing including parents in Jharkhand)सोनी कुमारी या तरुणीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चितेवरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. 

या प्रकरणात कोडरमा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रामाशंकर सिंह यांच्या न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पूर्ण केल्यानंतर १५ मार्च रोजी मृत सोनी कुमारीचे वडील किसून साव, आई दुलारी देवी, काका सीताराम साव आणि काकी पार्वती देवी यांना दोषी ठरवले होते. दरम्यान आज न्यायालयाने शिक्षेबाबत सुनावणी करताना चारही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

या घटनेनंतर चारही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मृत सोनी कुमारी हिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिचे आई-वडील नाराज झाले होते. त्या रागातून  त्यांनी सोनीची हत्या केली होती.  

टॅग्स :Courtन्यायालयJharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीHonor Killingऑनर किलिंग