Court convicted father in sexual harrasement of his own girl | पोटच्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्या बापास २५ वर्षाचा कारावास 
पोटच्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्या बापास २५ वर्षाचा कारावास 

ठळक मुद्देमंगळवारी ठाणे जिल्हा न्यायाल्याने दोषी ठरवून २५ वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.ही घटना भिवंडीतील शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

ठाणे - पत्नीला झोपेच्या गोळ्या देत पोटच्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास मंगळवारी ठाणे जिल्हा न्यायाल्याने दोषी ठरवून २५ वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. ही घटना भिवंडीतील शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज़्वला मोहोळकर यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.

Web Title: Court convicted father in sexual harrasement of his own girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.