कुरिअर बॉयवर चाकूने हल्ला करून लंपास केले २ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:44 IST2018-10-30T18:43:55+5:302018-10-30T18:44:30+5:30
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाटलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकूने हल्ला केला.

कुरिअर बॉयवर चाकूने हल्ला करून लंपास केले २ कोटी
मुंबई - लोअर परेल परिसरात एका कुरिअर बॉयवर चाकुने हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम अणि दागदागिने असा एकूण २ कोटींचा ऐवज पळविल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाटलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, मुकेशने स्वतःचा बचाव करण्यासाठी या दोघांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, हल्लेखोरांनी मुकेशच्या हातावर चाकूने प्रहार केला आणि त्याच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुकेशने तात्काळ याची माहिती मालकाला दिली. मालकाने एन.एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. या बॅगेत रोख रककम आणि दागदागिने असा २ कोटींचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. याचा अधिक तपास सुरु आहे.