हॉटेलमधील जोडपं दुपारी एक खोली बुक करतात आणि म्हणतात की आम्ही संध्याकाळी ७ वाजता चेकआऊट करू. रात्री ८ वाजता हॉटेलवाल्यांना धक्का बसला आणि त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये टीव्ही जोरात आवाजात वाजत होता. जेव्हा दरवाजा आतून कोणी उघडत नव्हतं म्हणून डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला गेला. पलंगाच्या आत महिलेचा मृतदेह चादरीने लपेटलेल्या स्थितीत आढळला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. येथे न्यूटाऊनमधील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला. वास्तविक, अमित घोष आणि चुमकी घोष नावाचे जोडपे मंगळवारी दुपारी या हॉटेलमध्ये थांबले. हॉटेल ऑथॉरिटीने त्यांच्या आयडी प्रूफची झेरॉक्स कॉपी घेऊन त्याला खोली दिली. ओळखपत्रानुसार हे दोघेही पश्चिम मिदनापूरचे रहिवासी होते. संध्याकाळी 7 वाजता येथून चेकआऊट करणार असल्याचे त्यांनी रिसेप्शनमध्ये सांगितले.दरम्यान, मी आता परत येईल असे सांगून अमितने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सोडले.पण तो आला नाही. संध्याकाळी ७ वाजता जेव्हा त्यांनी चेकआउट केले नाही. तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी लँडलाईनला फोन केला. फोनवरून काहीच उत्तर न मिळाल्याने त्याने रूम गाठला आणि ठोठावला. आतमध्ये टीव्ही जोरात आवाजात सुरु होता. जेव्हा दार फार वेळ उघडले नाही, तेव्हा डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला. पलंगाच्या आत महिलेचा मृतदेह रजाईने गुंडाळलेला होता आणि बर्याच ठिकाणी तिच्या शरीरावर कापल्याच्या खुणा होत्या.हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने टेक्नोसिटी पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित घोष आणि मृत महिलेशी अमितचे संबंध शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
रात्री ८ वाजता हॉटेलमधून जोडपं निघणार होतं, दरवाजा उघडताच धक्का बसला...
By पूनम अपराज | Updated: December 23, 2020 17:58 IST
Crime News : ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. येथे न्यूटाऊनमधील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला.
रात्री ८ वाजता हॉटेलमधून जोडपं निघणार होतं, दरवाजा उघडताच धक्का बसला...
ठळक मुद्देवास्तविक, अमित घोष आणि चुमकी घोष नावाचे जोडपे मंगळवारी दुपारी या हॉटेलमध्ये थांबले. हॉटेल ऑथॉरिटीने त्यांच्या आयडी प्रूफची झेरॉक्स कॉपी घेऊन त्याला खोली दिली.