Satara News: जोडीने दारू प्यायचे, पण पतीला आवडायचे नाही; एक दिवस सटकली, मारहाणीत पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 14:51 IST2021-07-24T14:49:20+5:302021-07-24T14:51:48+5:30
Satara Crime news: पत्नी दारू प्यायची, नशेत पतीची सटकली, रात्री मारहाण केली अन् सकाळी उठून कामावर गेला तेव्हा लोकांना पत्नी उठत नसल्याचे सांगितले.

Satara News: जोडीने दारू प्यायचे, पण पतीला आवडायचे नाही; एक दिवस सटकली, मारहाणीत पत्नीचा मृत्यू
नागठाणे : पत्नीला अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन लागले होते. पत्नीने दारू पिलेली पतीला आवडत नव्हते. त्यातूनच दोघांमध्ये वाद विकोपाला गेला आणि पतीने अत्यंत निर्दयीपणे पत्नीचा खून केला. ही खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी साताऱ्य़ातील नागठाणे येथे घडली. (Wife drinking alcohole daily, husband killed her at night.)
मालन बबन गायकवाड (वय ५५, रा. नागठाणे, ता. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मालन गायकवाड आणि बबन गायकवाड (वय ६०) हे दोघे मुळचे वाई तालुक्यातील ढूंद या गावचे आहेत.
मात्र, सुमारे तीस वर्षांपासून हे दोघे नागठाणे येथे मोलमजुरीच्या निमित्ताने वास्तव्य करत आहेत. दरम्यान, मालन यांना अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. तर पती बबन हा सुद्धा दारू पित होता. पत्नी मालन ही दारू पिऊन सतत वाद घालायची. यातूनच पती पत्नीमध्ये वाद व्हायचे. मंगळवारी रात्रीही जेवण झाल्यानंतर दोघांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या बबन गायकवाडने लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या शेजारीच पती झोपी गेला.
सकाळी उठवल्यानंतर तो थेट कामावर गेला. तेथे त्याने पत्नी पडली असून, झोपेतून उठत नाही, असे सांगितले. त्यानंतर याची माहिती आजूबाजूला समजल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी मालन गायकवाड या रक्ताच्या थोरोळ्यात पडल्या होत्या. बोरगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी पती बबन गायकवाड याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे अधिक तपास करत आहेत..