शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

सावधान! कपलचा होईल 'खपल' चॅलेंज; सायबर पोलिसांनी दिला सावधगिरीचा इशारा

By मुकेश चव्हाण | Updated: September 25, 2020 15:32 IST

सध्या फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळी चॅलेज दिली जात आहे.

पुणे: सध्या फेसबुकवर कपल चॅलेज ठेवण्यात आले असून त्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तुम्ही पाठविलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे.

सध्या फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळी चॅलेज दिली जात आहे. त्यात बुधवारपासून फेसबुकवर असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. लोक पतीपत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.

या कपल चॅलेजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेज न करो़ केला तर कपलचा खपल चॅलेज होईल, असा इशारा पुणे सायबर पोलिसांनी दिला आहे. अनेकदा सोशल मिडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हे फोटो मार्फिंग केले जातात़ पॉर्न साईटवर टाकले जातात. अनेकदा बदला घेण्यासाठी या फोटोचा उपयोग केल्याचे दिसून आले आहे. अनेकदा असे फोटो भलत्या लोकांच्या हाती लागले तर त्यातून कुटुंबामध्ये चारित्र्याचा संशय घेतला जाऊ शकतो. त्यातून एखादी दुदैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा चॅलेजवर फोटो टाकताना समोरच्याची खात्री असल्याशिवाय असे फोटो शेअर न करण्याची सूचना सायबर पोलिसांनी केली आहे. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये असे फोटो मार्फिंग करुन ते पॉर्न साईटवर टाकले जातात़ त्याखाली महिला, तरुणींचा नंबर दिला जातो. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाल्याचे प्रकरणे समोर आली होती. काही जणांनी बदला घेण्यासाठी असे कृत्ये केली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

सोशल मिडियाच्या डिपीवर आपले फोटो लावू नये. त्याचा गैरवापर झाल्यास मनस्ताप वाट्याला येऊ शकतो. दुदैवाने संसारही उद्वस्त होऊ शकतो़ त्यामुळे नागरिकांनी अशा चॅलेजमध्ये आपले फोटो टाकताना सावधानता बाळगावी.- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे

इतर महत्वाच्या बातम्या-

कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसSocialसामाजिक