शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 10:58 IST

Man trapped in the affair of discount : जोसेफ सोबोलवेस्कीला चोरीच्या आरोपावरून तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) कोल्ड ड्रिंकची (Cold Drink) संपूर्ण रक्कम न भरल्याबद्दल एका व्यक्तीला मोठा भुर्दंड बसला आहे. या व्यक्तीला 50,000 डॉलर म्हणजेच 36 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्याला सात वर्षे तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. दरम्यान, या आरोपी व्यक्तीने कोर्टाला विनंती केली आहे की, एखाद्या किरकोळ गुन्ह्यासाठी अशी कठोर शिक्षा देऊ नये. 36 लाख देण्यास तो सक्षम नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. (The cost of 1 bottle of Cold Drink is Rs 36 lakh! Man trapped in the affair of discount)

अशी झाली गडबड...'न्यूजवीक'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया येथे राहणाऱ्या 38 वर्षीय जोसेफ सोबोलवेस्की (Joseph Sobolewski)याला कोल्ड्रिंक्ससाठी पूर्ण रक्कम न दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जोसेफ सोबोलवेस्की 23 ऑगस्ट रोजी एका दुकानात गेला होता, जिथे कोल्ड्रिंक्स बाटल्यांवर डिस्काउंट मिळत होता. या डिस्काउंटच्या नादात तो पूर्ण पैसे न देता निघून गेला.

43 सेंट कमी केले होते पेमेंटदुकानात एक बोर्ड होता ज्यावर लिहिले होते की, '​​3 डॉलरमध्ये दोन बाटल्या'. जोसेफ सोबोलवेस्कीने काउंटरवर 2 डॉलर दिले आणि एक बाटली घेऊन निघून गेला. ज्यावेळी त्याने दोन बाटल्या विकत घेतल्या तरच ही ऑफर मिळणार होती. म्हणजेच एक बाटली 2.29 डॉलरला होती, तर 1.50 डॉलरला नव्हती. यादरम्यान, या दुकानातील कॅशिअरला 43 सेंट कमी दिल्याचे समजताच ती जोसेफ सोबोलवेस्कीच्या मागे धावली. मात्र, तोपर्यंत तो तिथून आपल्या कारमध्ये बसून निघून गेला होता.

कॅशिअरने पोलिसांना कळवलेयानंतर कॅशिअरने पोलिसांना बोलावले. याप्रकरणी पेपेन्सिल्व्हेनिया स्टेट पोलिसांनी जोसेफ सोबोलवेस्की पकडले आणि त्याला अटक केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, जोसेफ सोबोलवेस्की 50,000 डॉलरचा दंड भरावा लागेल. तसेच, जर जोसेफ सोबोलवेस्की दोषी आढळल्यास त्याला किमान 7 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.

जोसेफ सोबोलवेस्कीला चोरीच्या आरोपावरून तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वी त्याने आपल्या कारमध्ये गॅस भरला आणि पैसे न देता निघून गेला. त्याचप्रमाणे, 2011 मध्ये त्याने काही चप्पल चोरी केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वीही त्याने 7 वर्षे तुरुंगात काढली आहेत. दरम्यान, वारंवार गुन्हे केल्याबद्दल त्याला इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिका