चाकणला नगरसेवकाच्या गाडीची तोडफोड,पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:38 IST2019-03-09T18:35:59+5:302019-03-09T18:38:11+5:30
चाकण येथील नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवकाच्या इनोव्हा कारची तोडफोड करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली...

चाकणला नगरसेवकाच्या गाडीची तोडफोड,पाच जणांवर गुन्हा दाखल
चाकण : चाकण येथील नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक राहुल किसन कांडगे यांच्या इनोव्हा कारची तोडफोड करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आठ मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास चाकण मार्केट यार्डजवळील मुंगसे हॉस्पिटलजवळ फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली. याबाबत नगरसेवक राहुल किसन कांडगे (वय ३५, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विवेक कुऱ्हाडे , प्रतीक सोनवणे, रवींद्र कळसकर, मोनेश घोगरे, प्रतीक जाधव व संदीप शिंदे (सर्व रा. चाकण ) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी कांडगे यांच्या मालकीची इनोव्हा कार क्रमांक ( एम. एच. १४ / ईयू ८००० ) हिची पाठीमागील काच फोडून नुकसान केले. व कांडगे यांस दमदाटी करून शिवीगाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार हे पुढील तपास करत आहेत.