ठळक मुद्देलोक या विनंतीला न जुमानता गर्दी करत आहे आणि वरुन 'पोलीस मारतात' अशी तक्रारही केली जात आहे.परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ती चांगलीच लोकप्रिय होत आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - जगभरात कोरोना ने थैमान घालत लाखो लोकांना अद्याप गिळंकृत केले आहे. सध्या भारतात देखील हा विषाणू हातपाय पसरत असून घरात राहून सुरक्षित राहा', असे वारंवार पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, तरी देखील लोक या विनंतीला न जुमानता गर्दी करत आहे आणि वरुन 'पोलीस मारतात' अशी तक्रारही केली जात आहे. त्यानुसार 'आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही' असे सांगत लोकांची समजूत काढणाऱ्या पोलिसांची ही क्लिप आहे. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ती चांगलीच लोकप्रिय होत आहे.परिमंडळ ८ ने तयार केलेल्या या क्लीपमध्ये सुरवातीला पोलिसांची गाडी सायरन वाजवत एका परिसरात दाखल होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी गाडीतून उतरत गर्दी करून उभ्या असलेल्या लोकांची समजूत काढत रस्ता मोकळा करतात. मात्र पुन्हा काही वेळाने गस्तीवर आलेल्या या गाडीला लोक त्याच।ठिकाणी गर्दी करून उभे असल्याचे दिसते. तेव्हा 'आप लोग समज क्यो नही रहे', आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही ! पुरी दुनिया कोरोना महामारी से जुझ रहा है, हम आपके लिये अपनी जान जोखीम मे डालकर यहा खडे है, अशा आशयाचा संवाद असलेली ही क्लिप आहे. अखेर जमा झालेल्या नागरिकांना आपली चूक लक्षात येऊन 'हराना है, करोना को हराना है' या गीतामार्फत पोलिसांप्रति आपली भावना नागरिक व्यक्त करत संपूर्ण रस्ता निर्मनुष्य केला जातो.

सध्या मुंबईसह देशात असाच प्रकार सुरू आहे. लोकांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना नाईलाजास्तव लाठी उचलावी लागत आहे. मात्र त्यामागचे कारण लक्षात न घेता पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही लोक करत असून ही क्लिप त्यावर चोख उत्तर आहे. क्लिपच्या शेवटी उपायुक्त शिंगे पुन्हा नागरिकांनी घरात राहून स्वतःची काळजी घेण्याची विनंती करतात. ही क्लिप सध्या व्हायरल झाली असुन सत्य परिस्थिती मांडण्यात ती यशस्वी होत आहे.
 

Web Title: CoronaVirus : We are not happy to assault you! Police awareness video pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.