शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

CoronaVirus : धक्कादायक! क्वारंटाईन केलेल्या तरुणाची आत्महत्या; दोन दिवसांपूर्वीच पोहोचलेला गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:33 IST

CoronaVirus : त्याला श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर त्याला क्वारंटाइन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे शामलीतील एका निर्माणाधीन रुग्णालयात बांधण्यात आलेल्या एका वेगळ्या वॉर्डात दाखल झालेल्या युवकाच्या आत्महत्येच्या वृत्ताने रुग्णालयात खळबळ माजली. सहारनपूर आयुक्त यांनी माहिती दिली की, मृत व्यक्तीला व्यवसायात लाखोंचे नुकसान झाले होते.

मेरठ - गुरुवारी उत्तर प्रदेशमधील शामली येथील क्वारंटाइन वॉर्डमध्ये संभाव्य कोरोनाबाधित तरुणाने आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी हा तरुण त्याच्या गावी आला होता. त्यावेळी त्याला श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर त्याला क्वारंटाइन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. या युवकाच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.शामलीतील एका निर्माणाधीन रुग्णालयात बांधण्यात आलेल्या एका वेगळ्या वॉर्डात दाखल झालेल्या युवकाच्या आत्महत्येच्या वृत्ताने रुग्णालयात खळबळ माजली. हा तरुण दिल्लीत काही व्यवसाय करतो असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परत आला, त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास झाला.त्याला त्वरित क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आणि त्याचे नमुना मेरठ मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविला गेला, परंतु अद्याप अहवाल आलेला नाही. गुरुवारी त्याने आत्महत्या केली. सहारनपूर आयुक्त यांनी माहिती दिली की, मृत व्यक्तीला व्यवसायात लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांचा सखोल चौकशी करत आहे.

 

एसपी शामली विनीत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सीएमओ शामली संजय भटनागर यांनी पोलिसांना माहिती दिली की आरोग्य विभागामार्फत बांधकाम सुरू असलेल्या जिल्हा रूग्णालयाच्या क्वारंटाइन भागात दाखल झालेल्या संभाव्य कोरोनाबधित युवकाने आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच आदर्श मंडी पोलिस ठाणे घटनास्थळी पोहोचले व तपास केला. एसपीच्या म्हणण्यानुसार, एका तरूणाने गगळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून येते. हा तरुण कंधलका येथील नानूपुरी गावचा रहिवासी आहे. तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल