शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:23 PM

Coronavirus : सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मागणी

ठळक मुद्देविषेशतः जर अशी व्यक्ति बाहेर फिरत असल्यास त्यांच्यामुळे प्रादूर्भाव वाढू शकतो.पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपा आमदार ऍड.पराग अळवणी यांनी आज एका पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकड़े सदर मागणी केली.

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सहार तथा मरोळ सारख्या अत्यंत दाटीवाटिच्या वस्त्या ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येतात त्या सहार पोलीस ठाण्यातील ३२ जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सदर पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपा आमदार ऍड.पराग अळवणी यांनी आज एका पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकड़े सदर मागणी केली. तसेच त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकड़े सदर पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.एकाच पोलीस ठाण्यात ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागण होणे अतिशय गंभीर परिस्थिती असून आपल्या योद्धाची काळजी घेणे तसेच मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण का होत आहे ? याबाबत विचार करावा लागेल. तसेच पुढील काळातील या लढाईत पुरेसा स्टाफ उपलब्ध असावा या बाबतही नियोजन करावे लागेल असे अळवणी यांनी पत्रात नमूद केले आहे.सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित विमानतळ येत असून सद्या प्रदेशातून येत असलेले प्रवासी तसेच कार्गोमुळे तेथे मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर आहे. तसेच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेला सहार व मरोळ पाईपलाइन सारख्या भागात सुमारे ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामुळे सुद्धा तेथील कर्तव्य बजावणारे पोलिसकर्मी हाय रिस्कमध्ये येतात अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार मात्र सकारात्मक हाय रिस्कमध्ये असलेल्या व्यक्तिची चाचणी करण्यात येत नाही. यामुळे असे संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण मात्र चाचणी शिवाय ट्रेस होत नाहीत. यामुळे अशा व्यक्ति मात्र सायलेंट कॅरिअर असल्याने इतरांना विष्णुने संक्रमित करु शकतो. विषेशतः जर अशी व्यक्ति बाहेर फिरत असल्यास त्यांच्या मुळे प्रादूर्भाव वाढू शकतो.

त्याच सोबत हे पण ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की वर्षभरापूर्वी कर्तव्याच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्यातरी वर्षानुवर्षे विचित्र वेळापत्रकामुळे व कर्तव्य बजावत असताना असलेल्या मानसिक ताणामुळे पोलिसांमधली रोगप्रतिकारशक्ति कमी असू शकते. एखाद्या विषम परंतू सकारात्मक कोरोना रुग्णामुळे अशा एखाद्या असुरक्षित व्यक्तिस लागण झाल्यास गंभीर परिस्थिति निर्माण होउ शकते ऐसे पत्रात नमूद करत त्यांनी त्वरित उपाययोजनेची आवश्यकता शेवटी विशद केली.

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

 

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईcommissionerआयुक्तBJPभाजपाParag Alavaniपराग अळवणी